4th March 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज ४ मार्च २०२४ ला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी व नवमी तिथी एकत्र जुळून आली आहे. या दिवशी पंचांगानुसार सिद्धी व वज्र योग सुद्धा सक्रिय असणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दुपारी १२ वाजून ९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज ४ मार्च २०२४ मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे पाहूया..

मेष:-नटण्याची हौस पूर्ण कराल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल.

15th April Panchang rashi bhavishya Family happiness to sudden wealth gain zodiac signs For marathi horoscope
१५ एप्रिल पंचांग: कौटुंबिक सौख्य ते अचानक धनलाभ; मेष ते मीन ‘या’ राशींच्या आयुष्यात आज नवं काय घडणार?
14th April Panchang rashi bhavishya mesh to meen these zodiac signs will benefit from wealth Daily marathi horoscope
१४ एप्रिल पंचांग: मिथुन, तूळसह ‘या’ राशींना धनलाभाचा योग , तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार? वाचा १२ राशींचे भविष्य
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?

वृषभ:-प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

मिथुन:- मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल. करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.

कर्क:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:-दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. जवळचे मित्र भेटतील. भावंडांच्या समस्या समजून घ्याल.

कन्या:-जुन्या कामातून लाभ होईल. पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल. मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल. व्यावसायिक लाभ उत्तम होईल.

तूळ:-आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल. आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल. कामाचा उरक वाढेल. चिकाटीने कामे कराल.

वृश्चिक:-आध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. ऐहिक गोष्टींची कामना करू नये. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा.

धनू:-अचानक धनलाभ संभवतो. मित्रांशी मतभेद संभवतात. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. भडकपणे मत मांडू नका.

मकर:-जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल. जबाबदारीने कामे उरकाल. चार-चौघांत कौतुक केले जाईल.

हे ही वाचा<< भागवत एकादशीला बुधाचे महागोचर; ‘या’ ४ राशींना दाखवणार सोन्याचे दिवस; महाशिवरात्रीआधीच होईल भरभराट

कुंभ:-अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी. वडीलांच्या मताचा आदर करावा. इतरांना आनंदाने मदत कराल.

मीन:-मुलांचा उडणारा गोंधळ दूर करावा. सतत काळजी करत बसू नये. रेस जुगारातून लाभ संभवतो. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर