Rashi Bhavishya 5 August 2026 In Marathi : आज ५ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील सप्तमी तिथी रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून १ मिनिटांनी अश्विनी नक्षत्र जागृत असेल आणि रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी शूल योग जुळून येईल. राहू काळ १३ वाजून ३२ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज कोणताही अभिजात मुहूर्त नाही. बुधवारी तुमच्या आयुष्यात काय घडणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ५ ऑगस्ट २०२६ (Today Horoscope 5 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना कडून टाका. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मनोवांच्छित लाभेल. चर्चेतून कोंडी फुटेल. वाहन जपून चालवावे. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
नवीन सोयी कराल. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खुश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्स च्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. हातातील कामातून समाधान लाभेल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
आज जोडीदार तुमच्यावर खुश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
