August Horoscope: ५ ऑगस्ट २०२६ रोजी बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच सूर्य आणि गुरु ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे या तिन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग तयार होणार आहे.
ज्योतिषांच्या मते, हा त्रिग्रही योग या ३ राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. तसेच व्यवसायातही चांगला नफा मिळेल. तर जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल.
वृषभ रास (Taurus Zodiac Sign)
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. घरात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण राहील.
सिंह रास (Leo Zodiac Sign)
सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ आणि फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यावसायिकांना मोठा व्यवहार मिळू शकतो, ज्यामुळे पुढे चांगला नफा मिळेल. गुंतवणुकीसाठीही हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक राहील.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac Sign)
वृश्चिक राशीच्या लोकांना त्रिग्रही योगामुळे आर्थिक फायदा होईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
