5th April 2024 Panchang Daily Marathi Horoscope: हिंदू पंचांगानुसार, आज फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असणार आहे. ५ एप्रिल २०२४ ला एप्रिल महिन्यातील पहिली एकादशी आहे. आजची तिथी ही पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. शुक्रवारच्या दिवशी आज धनिष्ठा नक्षत्र व साध्य योग असणार आहे. आज सकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून ते ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असला तरी आजचा संपूर्ण दिवस शुभ व लाभदायी असणार आहे. राशीचक्रातील १२ पैकी कोणत्या राशींना आजच्या दिवशी कसा लाभ होईल व कुणाला सतर्क राहावे लागेल, हे पाहूया..

पापमोचनी एकादशी विशेष राशी भविष्य

मेष:-कामातील बदल समजून घ्या. कामाचा व्याप वाढता राहील. मनावर फार ताण घेऊ नका. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.

21st May Panchang & Marathi Horoscope
२१ मे पंचांग: नृसिंह जयंतीला स्वाती नक्षत्रात उजळून निघेल तुमचंही नशीब? १२ राशींना मंगळवारी बाप्पा कसा देणार प्रसाद?
Shukra Gochar 2024
उद्यापासून ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाच्या नशिबाला मिळेल कलाटणी
17th May Panchang Marathi Dainik Rashi Bhavishya Friday
१७ मे पंचांग: धनु, मकरसह ‘या’ राशींच्या डोक्यावर वैभवलक्ष्मी ठेवेल हात; जोडीदारामुळे वाटेल आश्चर्य, १२ राशींचे भविष्य वाचा
16th May Panchang Horoscope Janaki Jayanti
१६ मे पंचांग: खर्च, उत्साह, प्रेमाची गणितं, मघा नक्षत्रात गुरुवार चमकणार; मेष ते मीनपैकी कुणाला लाभणार स्वामीकृपा
Budh Gochar on Akshaya Tritiya Next 21 Days Astrology
२१ दिवस ‘या’ ४ राशींच्या पायाशी यश घालेल लोटांगण; अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळपासून बुध देणार बुद्धी व धनाचे दान
Shani Jayanti 2024
सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? शनीदेवाच्या कृपेने ‘या’ रूपात मिळू शकते श्रीमंती
4th April Panchang, Ekadashi Marathi Rashi Bhavishya
४ मे पंचांग: वरुथिनी एकादशीला झोपलेलं नशीब जागं करणार भगवान विष्णू; माता लक्ष्मी देणार का तुम्हाला साथ?
29 April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
२९ एप्रिल पंचांग: शुक्राच्या नक्षत्रात सोमवार होणार वैभवदायी; आज लक्ष्मी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना देणार बक्कळ लाभ

वृषभ:-घराची दुरूस्ती काढाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल. प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.

मिथुन:-मित्रा मंडळींचा गोतावळा जमवाल. विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. व्यावसायिक अडचणी दूर कराव्यात. सामाजिक कामाकडे ओढ वाढेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

कर्क:-घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आपली आब राखून राहाल. पथ्य पाण्याकडे लक्ष द्यावे. मानसिक सौख्य जपावे.

सिंह:-कामाच्या ठिकाणी व्याप वाढता राहील. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे. मित्रांची मदत वेळेवर मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढेल.

कन्या:-कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. घरच्या मंडळींचे सौख्य वाढेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.

तूळ:-एकमेकांच्या बाजू विचारात घ्याव्यात. आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा. राहत्या घराचे प्रश्न उभे राहतील. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात . घाई घाईने कोणतेही काम करू नका.

वृश्चिक:-तब्येतीत सुधारणा दिसून येईल. दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल. मैत्रीत गैरसमज संभवतात. चांगल्या संगतीत राहावे. जवळचा प्रवास काळजीपूर्वक करा.

धनू:-कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. इतरांच्या सल्ल्याने नवीन योजना आखाल. घरच्या दुरूस्तीचे काम निघू शकते. मनावर काहीसे दडपण राहील. कामातून समाधान शोधावे.

मकर:-जोखमीचे व्यवहार सावधतेने करा. प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील. . सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. नवीन आर्थिक योजना आखाल.

कुंभ:-उष्णतेचे विकार संभवतात. कामाचा आलेख वाढता राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.

हे ही वाचा<< ३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत

मीन:-सामाजिक कामातून ओळखी वाढतील. स्थावरचे व्यवहार जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा होतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर