Mesh To Meen Horoscope : शुक्रवार ६ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी दुपारी १२ वाजून ०९ मिनिटांपर्यंत राहील. ध्रुव योग सकाळी १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच श्रवण नक्षत्र शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून १९ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर राहू काळ सकाळी १० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असेल.

याशिवाय आज श्री राम विवाह उत्सव म्हणजेच विवाह पंचमी आहे. विवाह पंचमी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला. म्हणूनच हा दिवस भगवान श्रीराम आणि सीता माता यांचा विवाहोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर श्रवण नक्षत्रात कोणाचा घाईघाडबडीत तर कोणाला दिवस आनंदात जाईल हे आपण जाणून घेऊया…

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा

६ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

वृषभ:- घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

मिथुन:- कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

कर्क:- उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.

सिंह:- बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

कन्या:- खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

तूळ:- एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

वृश्चिक:- झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू:- घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.

मकर:- अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कुंभ:- जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

मीन:- उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader