Horoscope Today 6 March 2026 In Marathi : आज ६ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर वृद्धी योग जुळून येईल आणि हस्त आणि चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज मराठी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे. आज बाप्पा तुमच्या राशीचे संकट दूर करणार का जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ६ मार्च २०२६ (Today Horoscope 6 March 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्‍यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

स्वत: चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर