Last Sankashti Chaturthi Of Marathi Year : सध्या हिंदू वर्षाचा शेवटचा महिना फाल्गुन सुरू आहे. यादरम्यान वर्षातील शेवटची भालचंद्र संकष्ट चतुर्थी उद्या ६ मार्च २०२६ रोजी असणार आहे. भालचंद्र शब्दाचा अर्थ ‘भाल’ म्हणजे कपाळ आणि ‘चंद्र’ म्हणजे शशी, असा होतो. ही संकष्टी चतुर्थी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या शुभ प्रसंगी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केली जाते, व्रतदेखील पाळले जाते. त्यामुळे आयुष्यात सुख आणि सौभाग्य वाढते, अशी मान्यता आहे.
ज्योतिषांच्या मते, भालचंद्र संकष्टी चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगात गणपती बाप्पांची पूजा केली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीच्या शुभ योगांबद्दल जाणून घेऊयात…
भालचंद्र संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
भालचंद्र संकष्टी चतुर्थी शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होईल ते शनिवार, ७ मार्च रोजी २०२६ सायंकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी संपेल.
भाद्रवास योग – चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला, दुर्मीळ भाद्रवास योग तयार होत आहे. हा योग संध्याकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. या काळात भद्रा पाताळात राहील. यादरम्यान भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृद्धी योग – फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीलाही वृद्धी योग निर्माण होत आहे. वृद्धी योग सकाळी ७ वाजून ०६ मिनिटांनी सुरू होईल. या योगात गणपती बाप्पाची पूजा केल्याने आनंद आणि सौभाग्य मिळेल. त्याशिवाय प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर संध्याकाळी शिववास योगदेखील निर्माण होत आहे.
- सूर्योदय – सकाळी ६ वाजून ४१ मिनिटे
- सूर्यास्त – संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटे
- चंद्रोदय – रात्री ९ वाजून १४ मिनिटे
- चंद्रास्त – सकाळी ८ वाजून १ मिनिटे
