Navpancham Yog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाला महत्वाचे स्थान आहे. ग्रहांचा राशी किंवा नक्षत्र बदलही तितकाच महत्वाचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीत दोन ग्रह १२० अंशांचा कोन तयार करतात. तेव्हा नवपंचम योग निर्माण होतो, ही एक शुभ ग्रहस्थिती मानली जाते. हा योग करिअर, व्यवसायात अनपेक्षित संधी घेऊन येतो आणि कामातील अडथळे दूर होऊ लागतात. ७ ऑगस्ट रोजी सूर्य-शनी यांच्यातील नवपंचम योग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो, ते जाणून घेऊया….

मेष: नवपंचम योग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. तुम्हाला करिअरमध्ये चांगली प्रगती करता येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. एक मोठी डील निश्चित होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील.तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना समाजात आदर आणि सन्मान मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. एका जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मित्राच्या मदतीने तुम्ही एखाद्या प्रयत्नात मोठे यश मिळवू शकता. एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान खूप मजबूत होऊ शकते. शासकीय किंवा प्रशासकीय कामात यश मिळू शकते.

धनु

नवपंचम योग धनु राशीसाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभासाठी शुभ संधी निर्माण होत आहेत. तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठ्या सुधारणा होऊ शकतात. जर तुम्ही परदेशात नोकरी शोधत असाल, तर तुम्हाला यश मिळू शकते. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

कुंभ

कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरीव नफ्याची अपेक्षा आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा लाभ मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करण्याची संधी आहे. या काळात तुम्ही आजारपणातूनही मुक्त होऊ शकता.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)