Mesh To Meen Horoscope : ७ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. दशमी तिथी रात्री ९ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. इंद्र योग दुपारी ४ वाजून १७ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच रोहिणी नक्षत्र आज संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच असे म्हंटले जाते की, इंद्र योगात व्यक्तीला कामात निश्चितच यश मिळते. तर आज कोणाच्या नशिबात सुख,समृद्धी आणि ऐश्वर्य येणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

७ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- प्रवासात काहीसा त्रास जाणवतो. कामातील तांत्रिक गोष्टी जाणून घ्याव्यात. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना दिवस चांगला जाईल. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.

वृषभ:- वैवाहिक खर्च वाढू शकतो. काही गोष्टी अचानक घडू शकतात. मनातील आकांक्षा पूर्ण कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन:- कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा लागेल. भागीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. नवीन लोकांशी सबुरीने वागावे. कोणतीही गोष्ट फार ताणू नका. कलेसाठी अधिक वेळ काढावा.

कर्क:- कामाच्या ठिकाणी रूबाब वाढेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. छुप्या शत्रूंचा त्रास कमी राहील. नातेवाईकांशी सबुरीने वागावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल.

सिंह:- मुलांच्या धावपळीकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

कन्या:- जमिनीच्या कामातून लाभ होईल. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन विषयक कामांना गती येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

तूळ:- भावंडाचे सहकार्य मोलाचे ठरेल. कामात अधिक ऊर्जा येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वबळावर कामे हाती घेता येतील. काहीसा सुस्तपणा जाणवेल.

वृश्चिक:- मुलांच्या कालगुणांना वाव द्यावा. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मित्र-परिवार जमवाल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल.

धनू:- घाईने निर्णय घेऊ नका. आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. खर्चाकडे लक्ष ठेवावे. कौटुंबिक प्रश्न आधी मार्गी लावावेत.

मकर:- प्रवासात काळजी घ्यावी. कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. हस्तकलेला अधिक वेळ द्यावा.

कुंभ:- सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मानसिक स्वास्थ्य जपावे.

मीन:- तुमच्यातील कलेचे सर्वदूर कौतुक केले जाईल. प्रेमळपणे गोष्टी साध्य करता येतील. दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 february 2025 horoscope what is written in your destiny in indra yoga read rashi bhavishya in marathi asp