Daily Horoscope 7 July 2026 In Marathi : आज ७ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील अष्टमी तिथी असणार आहे. आज उत्तरभाद्रपदा नक्षत्र जुळून येईल, त्याचबरोबर शोभन योग एकाच दिवशी जुळून येत आहेत. राहू काळ ३ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त ३ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. आजचा मंगळवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ७ जुलै २०२६ ( Horoscope Today 7 July 2026 In Marathi)

आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

कामात जैसेथे परिस्थिती राहील. काही जबाबदार्‍या नव्याने वाढतील. आवडी निवडीबाबत आग्रही राहाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. चटपटीत पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल.

आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चार चौघात मिळून मिसळून वागाल. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. हौस पूर्ण करून घ्याल.

आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

वरिष्ठांच्या सल्ल्याने तजवीज करावी. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच काही खर्च देखील वाढतील. मानसिक दोलायमानता दूर करावी. कामाचे नियोजन यशस्वी होईल.

आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

कामाचा आवाका लक्षात घ्या. क्षुल्लक गोष्टींमुळे कामे रेंगाळू शकतात. अडथळ्यातून प्रयत्नाने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होईल.

आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

तरूणांशी मैत्री वाढेल. त्यांचे नवीन विचार जाणून घ्याल. बरेच दिवसा नंतर जुने मित्र भेटतील. कमिशनमधून चांगला लाभ उठवाल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.

आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. चार चौघांसमोर तुमची कला सादर करता येईल. मुलांकडून गोड बातम्या मिळतील.

आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीकडून मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मोठ्या लोकांची ओळख होईल.

आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

जुने प्रश्न मार्गी लावाल. कामाचा ताण वाढू शकतो. वडीलधार्‍यांचा विरोध सहन करावा लागेल. मनातील निराशा झटकून टाका. जुन्या मित्रांशी संपर्क साधता येईल.

आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

सामाजिक गोष्टींचे भान राखावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांना आपलेसे कराल. फटकळपणे बोलणे टाळा. वाईट संगतीचा मार्ग स्वीकारू नका. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता.

आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

कामातील ऊर्जा वाढेल. चिकाटी कमी पडू देऊ नका. सारासार विचाराने उलाढाल करा. प्रेमप्रकरणाला नवीन चैतन्य लाभेल. एकमेकांचे विचार जाणून घ्याल.

आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

घरात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक सुखसोईंकडे विशेष लक्ष द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मानसिक आनंदाचा दिवस.

आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

प्रवासाची आवड भागवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाद्य शिकायला सुरवात करावी. जवळच्या मित्र मंडळींमध्ये दिवस घालवाल. गैरसमजाची ठिणगी पडू देऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर