7 July Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार आणि संवादाचा कारक ग्रह मानलं जातं. ७ जुलै २०२६ रोजी बुध स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग देखील तयार होणार आहे. बुध ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मिथुन राशीत राहील. त्यानंतर तो कर्क राशीत प्रवेश करेल.
बुधाचं मिथुन राशीत होणारं हे गोचर ४ राशींसाठी करिअरच्या दृष्टीने खूप शुभ मानलं जात आहे. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. अचानक धनलाभ होण्याचेही योग आहेत. विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. जाणून घेऊया त्या ४ राशी कोणत्या आहेत.
मेष राशी (Aries Horoscope)
बुधाचं मिथुन राशीत होणारं गोचर मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. ७ जुलैपासून नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. एखादा मोठा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. आर्थिक स्थितीतही चांगली सुधारणा दिसून येईल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याचेही योग आहेत. तुमचं बोलणं आणि संवाद कौशल्य प्रभावी ठरेल, ज्यामुळे व्यवसायात चांगलं नाव कमावू शकता.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
७ जुलै २०२६ पासून मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगल्या काळाची सुरुवात होऊ शकते. तुमच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे हे गोचर तुम्हाला मोठं यश मिळवून देऊ शकतं. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारातूनही लाभ मिळेल. एखादी आनंदाची बातमी कानावर पडू शकते. बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही चांगला नफा मिळू शकतो.
कन्या राशी (Virgo Horoscope)
बुधाचं हे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. ज्या व्यवहारासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता, तो यशस्वी होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. वेगवेगळ्या मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीतही चांगल्या संधी मिळू शकतात.
धनु राशी (Saggitarius Horoscope)
बुधाचं गोचर धनु राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले परिणाम देऊ शकतं. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. कामानिमित्त परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. या राशीतील बेरोजगार लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
