7 May Horoscope Chandra Gochar: चंद्र ७ मेच्या रात्री धनु राशीतून बाहेर पडून शनीच्या राशी मकरमध्ये गोचर करणार आहे. चंद्र ७ मेच्या रात्री १ वाजून २७ मिनिटांनी गोचर करेल. शनी आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात, त्यामुळे हा गोचर काही राशींसाठी प्रतिकूल ठरू शकतो. या राशींना आरोग्य आणि पैशांशी संबंधित अडचणी येऊ शकतात. १० मेपर्यंत या राशींनी खूप सावध राहून पुढे जावे. चला, या राशींबद्दल जाणून घेऊया.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

चंद्र मनाचा कारक ग्रह आहे आणि तुमच्या राशीपासून अष्टम भावात गोचर करेल. मकर राशीत चंद्र असल्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो, त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. उगाच विचार करण्यापेक्षा कामावर लक्ष द्या. योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. पैशांच्या बाबतीतही काळजी घ्या. विचार न करता गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. १० मेपर्यंत करिअरबाबत मोठे निर्णय घेऊ नका. उपाय म्हणून शिवलिंगावर पाणी अर्पण करा.

सिंह राशी (Leo Horoscope)

चंद्र तुमच्या राशीपासून सहाव्या भावात गोचर करेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. सहकाऱ्यांशी बोलताना विचारपूर्वक बोला. लपलेले शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. मकर राशीत चंद्र असल्यामुळे खर्च वाढू शकतो आणि आर्थिक स्थिती हलू शकते. आरोग्याचीही काळजी घ्या. सर्दी-खोकला यांसारख्या समस्या होऊ शकतात. उपाय म्हणून दूध, तांदूळ, पांढरे कपडे दान करा.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

चंद्र तुमच्या हानीच्या म्हणजे द्वादश भावात गोचर करेल, त्यामुळे पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आजारासाठी खर्च करावा लागू शकतो. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, चोरी होऊ शकते. बेरोजगार लोकांना मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र १० मेनंतर परिस्थिती सुधारेल आणि चांगले परिणाम मिळतील. उपाय म्हणून शिव चालीसाचा पाठ करा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)