8 December Astrological Predictions For Zodiac Signs : रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज शततारका नक्षत्र ४ वाजून २ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर आज वज्र योग जुळून येईल. आज राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असेल. तर आजचा रविवार १२ राशींसाठी कसा जाईल? आज कोणत्या राशीच्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊया…

८ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
8 january rashi bhavishya and panchang in marathi todays horoscope rashi mesh to meen aries to pisces zodiac signs
८ जानेवारी राशिभविष्य: अश्विनी नक्षत्रात होणार इच्छापूर्ती! तर‌ ‘या’ राशींवर धनवर्षाव, आज १२ पैकी कोणत्या राशीच्या कुंडलीत लिहिलंय सुख? वाचा तुमचे राशिभविष्य
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
When will the solar and lunar eclipses
वर्ष २०२५मध्ये केव्हा लागणार सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहण! जाणून घ्या तारीख आणि भारतात कधी दिसणार की नाही?
5 January 2025 Rashi Bhavishya In Marathi ५ जानेवारी राशिभविष्य
5 January Horoscope: जानेवारीच्या पहिल्या रविवारी ‘या’ राशींना होईल धनलाभ, तर यांचा दिवस जाईल आनंदात; जाणून घ्या मेष ते मीन राशींचे आजचे भविष्य

वुषभ:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.

मिथुन:- वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क:- भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह:- कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.

कन्या:- आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल.

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक:- काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.

धनू:- हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर:- मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:- घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

मीन:- सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader