8 january 2025 rashi bhavishya in marathi: आज ८ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे आणि बुधवारचा दिवस आहे. नवमी तिथी आज दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. आज रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. तसेच अश्विनी नक्षत्र आज दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात अव्वल मानल्या जातात. याशिवाय, ते गूढ विषयांचा अभ्यास करणारे देखील मानले जातात. आज राहू काळ सायंकाळी १२ वाजल्यापासून सुरू होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. दरम्यान, आजचा अश्विनी नक्षत्र मेष ते मीन राशींना मिळवून देईल का धन आणि सुख, जाणून घेऊयात…

८ जानेवारी पंचांग व राशिभविष्य : (8 January 2025 Horoscope)

11 February 2025 Horoscope In Marathi
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rahu Shukra Yuti 2025
१८ वर्षानंतर राहु-शुक्राची युती, या तीन राशींना मिळेल गडगंड श्रीमंती; सुरू होईल सुवर्णकाळ
9 February 2025 Rashi Bhavishya
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल
Valentines Day 2025 Horoscope
‘व्हॅलेंटाईन डे’ला काही लोकांना भेटणार कोणीतरी खास तर काहींच्या आयुष्यात फुलणार प्रेम, जाणून घ्या कोणत्या आहेत ‘या’ लकी राशी
Mesh To Meen Horoscope
८ फेब्रुवारी पंचांग: जया एकादशीला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वादाने कर्क, कन्या राशीला होईल लाभ; तुमचे नशीब आज बदलणार का ?
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण

मेष:- अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

वृषभ:- आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.

कर्क:- धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

सिंह:- जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

कन्या:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:- इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:- आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल.

धनू:- कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.

मकर:- आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.

कुंभ:- सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

मीन:- आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

Story img Loader