8th June Panchang & Rashi Bhavishya: ८ जून २०२४ ज्येष्ठ महिन्यातील उदयातिथीनुसार द्वितीया तिथी असणार आहे. शनिवारच्या दिवशी ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी असणार आहे व नंतर तृतीया तिथी सुरु होणार आहे. ८ जून २०२४ च्या संध्याकाळपर्यंत ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे व संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत गंड योग तयार होणार आहे. सूर्य उद्या वृषभ राशीत असणार आहे व चंद्र मिथुन राशीत असणार आहे. आजच्या दिवशी अभिजात मुहूर्त ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. मेष ते मीन राशींचा आजचा दिवस कसा जाणार हे पाहूया..

८ जून पंचांग व राशी भविष्य

16th July Panchang & Marathi Rashi Bhavishya
१६ जुलै पंचांग: आषाढी एकादशीच्या २४ तास आधी १२ राशींवर ‘या’ रूपात विठ्ठल- रुक्मिणी धरणार कृपेचं छत्र, काय सांगते तुमची रास?
8th July Panchang & Rashi Bhavishya Marathi
८ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या पहिल्या सोमवारी ५६ मिनिटांचा अभिजात मुहूर्त; कोणत्या राशीच्या नशिबाला मिळेल कलाटणी?
7th July Panchang & Rashi Bhavishya Marathi
७ जुलै पंचांग: पत्नीचं वर्चस्व, अचानक धनलाभ, कामाचं सुख.. पुष्य नक्षत्रात रविवारी १२ राशींचे भविष्य कसे असणार वाचा
5th July Panchang & Marathi Horoscope
५ जुलै पंचांग: आर्द्रा नक्षत्रात आज सुखाच्या सरी बरसणार? ‘या’ राशींचा दिवस आनंदाने होईल सुरु, अमावस्या विशेष राशी भविष्य वाचा
4th July Panchang & Marathi Rashi Bhavishya
४ जुलै पंचांग: मासिक शिवरात्रीच्या दिवशी आज महादेव कुणावर धरणार कृपेचं छत्र? तुमच्या राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय?
26th June Panchang & Rashi Bhavishya
२६ जून पंचांग: प्रीती योगामुळे आजचा दिवस शुभ, पण मेष ते मीन सर्वच राशींना राहावे लागेल ‘या’ गोष्टींपासून सावध, वाचा तुमचं भविष्य
Angaraki Sankashti Chaturthi 25th June Rashi Bhavishya & Panchang
संकष्टी चतुर्थी, २५ जून पंचांग: २०२४ च्या एकमेव अंगारकीला मोदक पेढे वाटण्याचा योग आज मेष ते मीनपैकी कोणत्या राशीत?
21st June Panchang & Rashi Bhavishya
वटपौर्णिमा विशेष, २१ जून पंचांग: आज मेष ते मीन पैकी कुणाला लाभणार सौभाग्य; तुमच्या नशिबात कोणत्या रूपात येईल सुख?

मेष:-उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावी लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.

वृषभ:-कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्‍यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.

मिथुन:-इतरांवर विसंबून राहू नका. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क:-प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.

सिंह:-मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे.

कन्या:-अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. कमिशन मधून लाभ संभवतो.

तूळ:-मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.

वृश्चिक:-किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू:-मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.

मकर:-कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अति विचार करू नका.

कुंभ:-दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही नवीन वस्तु खरेदी केल्या जातील.

मीन:-मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणि‍वेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर