8th May Panchang & Rashi Bhavishya: ८ मे २०२४ ला चैत्र कृष्ण अमावास्येचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी सुरु झालेली अमावस्येची तिथी आज सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांनी संपणार आहे. यानंतर वैशाख मास सुरु होणार आहे. वैशाख शुक्ल पक्ष प्रतिपदा सुरु झाल्यावर संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग कायम असणार आहे. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत भरणी नक्षत्र जागृत असणार आहे. ८ मे ला अमावस्येचे स्नान- दान पार पडणार आहे. बुधवारच्या दिवशी पंचांग व वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मेष ते मीन राशीला कसे फळ प्राप्त होणार आहे हे पाहूया..

८ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल.

Budhaditya Rajyog 2024 surya and mercury will make in budhaditya rajyog 3 these zodiac sign get more profit
२०२५ मध्ये बुधादित्य राजयोग; ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत! बुध, सूर्यदेवाच्या कृपेने सर्व अडचणी होणार दूर?
Shani jayanti on 6th June 2024 Five Zodiac Signs Life To Take Turn
६ जूनला शनी जयंतीपासून 5 राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; पावसाआधी बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?
three zodic signs will shine with Nakshatra transformation
सूर्य देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य
25th May Panchang Marathi Rashi Bhavishya Mesh To Meen Daily Horoscope
२५ मे पंचांग, शनिवार: ज्येष्ठा नक्षत्र व सिद्ध- साध्य योगाचा प्रभाव तुमच्या राशीत आज काय बदलणार? १२ राशींचे भविष्य वाचा
21st May Panchang & Marathi Horoscope
२१ मे पंचांग: नृसिंह जयंतीला स्वाती नक्षत्रात उजळून निघेल तुमचंही नशीब? १२ राशींना मंगळवारी बाप्पा कसा देणार प्रसाद?
Shukra Gochar 2024
उद्यापासून ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाच्या नशिबाला मिळेल कलाटणी
Mohini ekadashi
Mohini Ekadashi : १२ वर्षानंतर मोहिनी एकादशीच्या दिवशी अद्भुत संयोग, ‘या’ राशी होतील मालामाल; मिळणार बंपर पैसा
16th May Panchang Horoscope Janaki Jayanti
१६ मे पंचांग: खर्च, उत्साह, प्रेमाची गणितं, मघा नक्षत्रात गुरुवार चमकणार; मेष ते मीनपैकी कुणाला लाभणार स्वामीकृपा

वृषभ:-अधिकार वाणीने बोलाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग करता येईल.

मिथुन:-मुलांची काळजी लागून राहील. उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

कर्क:-अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

सिंह:-मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदाराशी मतभेद वाढवू नका.

कन्या:-हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

तूळ:-कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

वृश्चिक:-कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका. भागीदारीत नवीन योजना आखाव्यात.

धनू:-अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

मकर:-नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.

कुंभ:-चटकन रागवू नका. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. कौटुंबिक वातावरणात रमून जाल.

हे ही वाचा<< अमावस्येला ३ दुर्मिळ योग; शनी- गुरु- शुक्राच्या राशी होतील गडगंज श्रीमंत? दुःखाचे ढग सरतील, पितर देतील लाभ

मीन:-दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. नवीन कामे अंगावर पडतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर