9 June Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा शुभ ग्रह दोन अशुभ ग्रहांच्या मध्ये येतो, तेव्हा त्याला पापकर्तरी योग असे म्हटले जाते. ९ जून म्हणजेच मंगळवारी सकाळी असा एक योग तयार होणार आहे. या दिवशी चंद्र कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी एका बाजूला राहू कुंभ राशीत आणि दुसऱ्या बाजूला मंगळ मेष राशीत असेल, त्यामुळे चंद्र या दोन्ही ग्रहांच्या मध्ये येईल.
इतकंच नाही तर या काळात चंद्राचा संबंध शनिशीही राहणार असल्याने या योगाचा प्रभाव अधिक गंभीर होऊ शकतो. विशेषतः दोन राशींसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक ठरू शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या योगाचा परिणाम तुमच्यावर थेट दिसू शकतो. या काळात तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही तणाव जाणवू शकतो. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी कठीण ठरू शकते. कुटुंबातही काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या काळात कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळा. तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करू नका. पैशांशी संबंधित कोणताही मोठा निर्णय सध्या पुढे ढकललेला चांगला राहील.
उपाय – दररोज भगवान शिवांचे स्मरण करा. शिवमंत्रांचा जप केल्याने मनाला शांतता मिळू शकते.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठीही हा योग थोडा त्रासदायक ठरू शकतो. या काळात राग वाढू शकतो, त्यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. बोलताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असेल.
कामाच्या ठिकाणी कोणत्याही वाद-विवादापासून किंवा राजकारणापासून दूर राहा, अन्यथा विनाकारण अडचणी वाढू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पोट, घसा किंवा कानाशी संबंधित काही त्रास होऊ शकतो, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना देखील विशेष काळजी घ्या.
उपाय – दररोज ध्यान आणि योग करा. तसेच हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
