9th May 2024 Marathi Horoscope: ९ मे २०२४ वैशाख शुक्ल प्रतिपदा व द्वितीयेला गुरुवार आहे. प्रतिपदा तिथी ही गुरुवारी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी संपल्यावर द्वितीया तिथी सुरु झाली आहे. ९ मे ला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत शोभन योग असणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे व त्यानंतर रोहिणी नक्षत्र असणार आहे.

९ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-अती विचार करू नका. मैत्रीचे संबंध जपावेत. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल.

4th June Panchang & Marathi Rashi Bhavishya
४ जूनला कुणाचं नशीब कसं घेईल कलाटणी? पंचांगानुसार आज ५५ मिनिटं महत्त्वाची, वाचा तुमच्या राशीचे आजचे भविष्य
16th May Panchang Horoscope Janaki Jayanti
१६ मे पंचांग: खर्च, उत्साह, प्रेमाची गणितं, मघा नक्षत्रात गुरुवार चमकणार; मेष ते मीनपैकी कुणाला लाभणार स्वामीकृपा
June Monthly Marathi Horoscope
शनी जूनचे ३० दिवस करणार १२ राशींवर राज्य; मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे भविष्य वाचा, तुमच्या नशिबात धन आहे की कष्ट?
26th May Ekadant Sankashti Chaturthi 55 Minutes Abhjiaat Muhurta Mesh To Meen Rashi Bhavishya
एकदंत चतुर्थी, २६ मे पंचांग: संकष्टीला दुपारी ५५ मिनिटांचा अभिजात मुहूर्त; मेष ते मीनपैकी कुणाचा दिवस असेल मोदकासारखा गोड?
23 May Marathi Panchang Budhha Purnima Shani Nakshtra
२३ मे पंचांग: जोडीदाराचं प्रेम, अपार बुद्धी; बुद्ध पौर्णिमेला शनीचं नक्षत्र जागृत होताच १२ राशींच्या कुंडलीत उलथापालथ, पाहा भविष्य
17th May Panchang Marathi Dainik Rashi Bhavishya Friday
१७ मे पंचांग: धनु, मकरसह ‘या’ राशींच्या डोक्यावर वैभवलक्ष्मी ठेवेल हात; जोडीदारामुळे वाटेल आश्चर्य, १२ राशींचे भविष्य वाचा
1st June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१ जून पंचांग: शनिवारी प्रीती खुलणार! मेष ते मीनपैकी १२ राशींना जून महिन्याचा पहिला दिवस कसा जाणार, वाचा भविष्य
31st may 2024 panchang marathi horoscope mesh to meen which rashi will earn good luck money on may 2024 last day rashi bhavishya lucky and unlucky zodiac signs
३१ मे पंचांग: महिन्याचा शेवटचा शुक्रवार, मेष ते मीन राशीला कसा जाईल? तुमच्यावरही होईल का देवी लक्ष्मीची कृपा? वाचा तुमचे राशीभविष्य

वृषभ:-सर्वांशी गोडीने वागाल. कामाचा व्याप लक्षात घ्यावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. सगळ्यांचे लक्षपूर्वक करण्यात दमून जाल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मिथुन:-कामात चालढकल करू नका. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा.

कर्क:-व्यावसायिक वाढीचे नियोजन आखाल. कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य जपावे लागेल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो.

सिंह:-वैवाहिक सौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल. कमिशन मधून मिळणारा फायदा लक्षात घ्यावा. कामाच्या ठिकाणी आपली पत जपावी.

कन्या:-जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. वडीलधार्‍या व्यक्तींचा विरोध होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:-नातेवाईकांशी सलोखा जपता येईल. कामात समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अती उत्साह दर्शवू नका.

वृश्चिक:- मित्रांशी मतभेदाची शक्यता आहे. करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. मुलांच्या आनंदात रमून जाल.

धनू:-घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील.

मकर:-कौटुंबिक सौख्य जपाल. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. बोलतांना कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेअर्स, लॉटरी यांचा अती हव्यास नको.

कुंभ:-धाडसाला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. आततायीपणे वागणे चुकीचे ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या.

हे ही वाचा<< ‘अक्षय्य तृतीयेला’ लक्ष्मी नारायण योग बनल्याने ‘या’ ३ राशींना चिरकाल धनप्राप्तीची संधी; १९ मे पर्यंत आनंदी आनंद गडे

मीन:-मनाजोग्या वस्तु खरेदी कराल. भावंडांचे वागणे रूचणार नाही. उगाचच टिप्पणी करायला जाऊ नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. संपूर्ण विचारांती निर्णय घ्यावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर