Horoscope Today 17 october 2026 In Marathi : आज १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असणार आहे. आज रवी योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र जुळून येईल. अभिजात मुहूर्त १२ वाजून ०० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज राहू काळ ९ वाजून २९ मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज नवरात्रीचा सातवा दिवस, आजचा रंग राखाडी आणि आज कालरात्री देवीच्या रूपाची पूजा केली जाईल. आजचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२६ (Today Horoscope 17 october 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
भावनिक गुंतागुंतीत अडकून राहू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
फसवणुकीपासून सावध रहा. पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना एकवार पुन्हा विचार करावा. मित्रांच्या भेटीचे योग. विनाकारण शंका घेऊ नका.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मित्र परिवाराच्या स्नेहाला जपा. व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. तुमच्या कृतीला विरोध होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
भावंडांची साथ मिळेल. कला जोपासत राहावे. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. ईश्वरावरील श्रद्धा दृढ होईल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
जुनी कामे मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. आजचा दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला नवीन अनुभवाला सामोरे जावे लागेल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न राहील.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
तुमचा करारी स्वभाव दाखवण्याची संधी मिळेल. नानाविध रंगांनी भरलेला दिवस. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. आहारावर नियंत्रण हवे.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कोणत्याही मुद्यावर संभ्रमित होऊ नका. ठामपणे निर्णय घ्या. आपली इतरांवर छाप पडेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
घरामध्ये मोठी खरेदी कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील. मुलांची चिंता सतावेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
जन संपर्कातून लाभ होईल. कलेत प्राविण्य मिळवाल. आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
पैसे खर्च करताना विचार करावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. काही वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हातातील कामे पार पडतील.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
स्वकर्तृत्वावर झेप घ्या. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. दिवसाचा उत्तरार्ध
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
बोलताना पुढच्या-मागच्या गोष्टीचा विचार करावा. लाभाच्या संधी प्राप्त होतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. कठीण कामे सुलभतेने होतील. अति तिखट पदार्थ खाऊ नका.
