Horoscope Today 27 September 2026 In Marathi : आज २७ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. आज वृद्धी योग आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ५ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त १२ वाजून ०५ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. रविवारी तुमच्या आयुष्यात काय घडणार जाणून घेऊ…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२६ (Today Horoscope 27 September 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. या मार्गावर काही अडचणी येतील. मेहनत व परिश्रम कायम ठेवा.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
घरातील कामात बराच वेळ अडकून पडाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. दिवस आनंदात घालवावा. मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल. काही वेळ स्वत:साठी ठेवावा.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. आज कोणालाही उधारी देऊ नका.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
आपल्या कडून उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील. व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये. उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
स्वत:चे काम स्वत:च करा. कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता. गरजेची कागदपत्रे जपून ठेवा.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मात्र वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा. आपली पत सांभाळून वागा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
आहारातील पथ्ये पाळा. इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. काही समस्या सामोरी येऊ शकतात. घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील. नातेवाईकांशी सलोखा ठेवा.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
उगाच डोक्यात राख घालू नका. कामे धिम्या गतीने पार पडतील. कमी बोलून कृतीवर भर द्यावा. याची सकारात्मक फळे दिसतील. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावाल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
आपल्या मतानुसार सर्व गोष्टी होतील असे नाही. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा. एखादे काम मधेच सोडू नका. स्वकर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अधिकार्यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. आपल्याच कामाशी संलग्न रहा.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नियोजित कामे पार पडतील. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क रहा. दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमचा प्रभाव कायम राहील.
