Daily Horoscope 3 october 2026 In Marathi : आज ३ ऑक्टोबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. आज वरियन योग आणि आर्द्रा नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ९ वाजून २९ मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त १२ वाजून ४ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिवारी तुमच्या आयुष्यात काय घडणार राशीनुसार जाणून घेऊ…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 3 october 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील.जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकनवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. कमिशन च्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जिभेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
