Daily Horoscope 1 october 2026 In Marathi : आज १ ऑक्टोबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असणार आहे. आज सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्र जुळून येईल. राहू काळ १ वाजून ५८ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त ११ वाजून ४७ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस असणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा जाणार चला जाणून घेऊ…
आजचे पंचांग व राशिभविष्य, २९ सप्टेंबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 30 September 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्या वाढतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.
