Daily Horoscope 30 September 2026 In Marathi : आज ३० सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आज वज्र योग आणि कृतिका नक्षत्र जुळून येईल. राहू काळ १२ वाजून २९ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त ११ वाजून ४७ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तर तुमच्यासाठी आजचा दिवस कसा जाणार जाणून घेऊया…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २९ सप्टेंबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 30 September 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.

दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. भावनिक गुंता वाढवू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

सामाजिक कामासाठी वेळ द्याल. जोखीम पत्करून काम कराल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. दैनंदिन कामात बदल करून पाहावं. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्‍या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा. नियोजित कामात बदल करू नका.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

मानसिक स्वास्थ्य जपावे. विचारांना योग्य दिशा द्यावी. प्रिय व्यक्तिला दुखवू नका. मित्राची योग्य साथ मिळेल. गरजूंना मदत कराल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. भावंडांशी नाते दृढ होईल. वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल. मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल. अति कर्मठपणे वागू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

करमणुकीत बराच काळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी. घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर