Horoscope Today 1 March 2026 In Marathi : आज १ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. त्याचबरोबर सौभाग्य योग जुळून येईल आणि अश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १ मार्च २०२६ (Today Horoscope 1 March 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
समानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. उत्तम गृहसौख्य लाभेल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.
