Rashi Bhavishya 4 May 2026 In Marathi : उद्या ४ मे २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. आज परीघ योग जुळून येईल असणार आणि अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४८ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ७ वाजता सुरु होईल ते ८ वाजून ५७ पर्यंत असणार आहे. तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ४ मे २०२६ (Dainik Rashi Bhavishya 4 May 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

कामाची धावपळ वाढू शकते. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

आवडी निवडीबाबत लक्ष द्याल. हसत-हसत आपले मत मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. क्षणिक सौख्यात रमून जाल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात दक्षता बाळगावी. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. सरकारी कामे पुढे सरकतील. जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

प्रकृतीची हेळसांड करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कामातील लाभाकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

भांडखोर लोकांपासून दूर राहावे. कामाचा ताण जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावे. उष्णतेचे विकार संभवतात. तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मैदानी खेळाची आवड जोपासाल. कामे वेळेत पार पडतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. भाजणे, खरचटणे यांसारखे त्रास संभवतात. दिवसभर कामाचा त्रास राहील. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल. परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टीकेमुळे निराश होऊ नका. मनाची चंचलता अध्यात्माने दूर करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारांची जाणीव ठेवावी.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

निराशाजनक विचार करू नये. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. आळस बाजूला सारून कामे करावीत. बोलताना तिखट शब्दांचा वापर कमी करावा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. चटकन रागवू नका. घाई-घाईने कोणतेही कृती करू नका. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

जुनी इच्छा पूर्णत्वास येईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल. थोरांचा मोलाचा सल्ला मिळेल. सामुदायिक वादविवादापासून दूर राहावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर