Rashi Bhavishya 11 April 2026 In Marathi : आज ११ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील नवमी तिथी रात्री ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल आणि दुपारी ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजून ११ मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिवार तुमच्या राशीसाठी कसा असणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ११ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 11 April 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
अति विचार करणे टाळावे लागेल. कामाचा बोजा वाढल्याने थकवा जाणवेल. आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
कामात चिकाटी ठेवावी लागेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापार्यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. तरुण वर्गाचे मत विचारात घ्याल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
वडीलधार्यांचा योग्य मान ठेवाल. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. लहान-सहान गोष्टींनी नाराज होऊ नका. अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो. छंदासाठी वेळ द्यावा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
भागीदाराशी सलोखा वाढेल. नवीन व्यावसायिक धोरण ठरवाल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा होतील. सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराची आवक वाढेल. कौटुंबिक शांतता जपावी. काही कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल. कफ विकारांपासून काळजी घ्यावी.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. पत्नीच्या सहवासात रमून जाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून उचलावीत.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
घरातील वातावरण खेळकर राहील. कामे आनंदात पार पडतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. दिवसभर कामात गुंतून राहाल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
आततायीपणे कोणतेही काम करू नका. जवळचा प्रवास घडेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल. शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
सामाजिक बांधीलकी जपाल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आवडी बाबत आग्रही राहाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल. बाग-बगीच्याच्या कामात मन गुंतवाल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
सर्वांशी लाडिकपणे बोलाल. आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.
