Today Horoscope 7 February 2026 In Marathi : आज ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्टी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी बुधवारी १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु झाली असून आज रात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर शूल योग जुळून येईल आणि चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तुमच्या राशीचा शनिवार कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ७ फेब्रुवारी २०२६ (Sankashti Chaturthi Daily Horoscope 7 February 2026 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
हौस पूर्ण करून घ्याल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चांचल्या जाणवेल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
दिवसभर कामात व्यग्र राहाल. पित्त विकार बळावू शकतात. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. घरातील कुरबुरी मध्ये लक्ष घाला. स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
सामुदायिक वादापासून दूर राहावे. धार्मिक स्थळांना भेट द्याल. ध्यान धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी . शांततेचा मार्ग स्वीकारावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
वेळेचे बंधन पळावे लागेल. श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
कौटुंबिक सौख्यात भर पडेल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल. सर्वांशी गोडीने वागाल.

