Abhijeet Dipke Numerology analysis reveals strong Mars and Saturn impact on his political future: अन्यायाविरुद्ध लढताना उद्रेकाची व्याख्या बदलून यशाचा मार्ग कसा शोधायचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके! संख्याशास्त्र आणि ग्रहांच्या स्पंदनानुसार अभिजीत दिपके यांच्या जन्मतारीख आणि नावामध्ये एक अद्भूत योग दडला आहे.
उत्तम मित्रांकामुळे यश
अन्यायाला सामोरं जाताना उद्रेकाची परिभाषा बदलून जगण्याचा मार्ग बदलला की, तो बदललेला मार्गच आपल्याला यशाकडे घेऊन जातो. अभिजीत दिपके या तरुणाच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आणि त्याने हाती घेतलेल्या कामात तो यशस्वी ठरला. जेव्हा कठीण परिस्थितीत एखादी व्यक्ती सापडते तेव्हा त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींचा मूलांक व भाग्यांक हा उत्तम मित्रांक असतो.
- संख्याशास्त्रानुसार अभिजीत दिपकेच्या जन्मतारीखेचे समीकरण
- २९/९/१९९५
- २+९+९+१+९+९+५ = ४४ = ८
- अभिजीत यांचा मूलांक २ आणि भाग्यांक ८ आहे.
- आता सोनम वांगचूक यांची जन्मतारीख पाहू.
- १/९/१९६६
- १+९+१+९+६+६ = ३२ = ५
- वांगचूक यांचा मूलांक १ आणि भाग्यांक ५ हे अभिजीतच्या मूलांकाचे उत्तम मित्रांक आहेत. त्यामुळे अभिजीत यांना सोनम यांची उत्तम साथ लाभली आणि परिस्थिती आटोक्यात राहून यश प्राप्त झाले. मुळात अभिजीत दिपके यांच्या पूर्ण जन्मतारखेत ९ अंकाचे अस्तित्त्व चार वेळा आले आहे. त्यामुळे पूर्ण जन्मतारखेवर ९ चा प्रभाव म्हणजेच मंगळाचा प्रभाव वाढला आहे. मंगळाची वृत्ती लढाऊ असते. अशा लोकांना अन्याय सहन होत नाही. त्यामुळे या व्यक्ती संघर्षाकडे वळतात.

विशेष म्हणजे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मतारखेतील मूलांक व भाग्यांक आणि अभिजीतच्या जन्मतारखेतील मूलांक व भाग्यांक यात खूपच साम्य दिसून येते, हा एक योगायोगच म्हणावा लागेल.
खाल्डियन पद्धतीने अभिजीत दिपकेच्या नावाची स्पंदने खालीलप्रमाणे –
ABHIJEET DIPKE
12511554 41825
24 20 = 44 = 8
पूर्ण नावाचा स्पंदन क्रमांक ८ आणि जन्मतारखेचा भाग्यांक ८ हा दिपकेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसिद्धीयोग दाखवतो तर जन्मपत्रिकेत शनी हाही कुंभ राशीत उच्च राशीत आहे. त्यामुळे मंगळ आणि शनी त्याला त्याच्या कामात उत्तम प्रसिद्धी देणार हे नक्की.
कॉक्रोच जनता पार्टी या नावाची स्पंदने
- COCKROACH JANTA PARTY
- 373227135 11541 81241
- 33 + 12 + 16 = 61 = 7
लोकांचे लक्ष वेधून घेणारी ऊर्जा
अभिजीत दिपके यांचा मूलांक २ असल्यामुळे त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव मानला जातो. चंद्र संवेदनशीलता, कल्पकता, लोकांशी सहज जोडून घेण्याची क्षमता आणि लोकप्रियता दर्शवतो. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाचा अंक ७ येतो. अंक ७चा संबंध केतूशी जोडला जातो. केतू वेगळेपण, अनपेक्षित यश, वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि लोकांचे लक्ष वेधून घेणारी ऊर्जा दर्शवतो.
प्रस्थापित चौकटींना प्रश्न विचारणारा
चंद्र संवेदनशीलता, जनभावना आणि माणसाच्या वेदनेशी जोडले जाण्याची शक्ती दर्शवतो. त्यामुळे अन्याय दिसला की, त्याकडे दुर्लक्ष न करता त्याविषयी बोलण्याची प्रेरणा चंद्राच्या प्रभावातून दिसते. केतू मात्र प्रस्थापित चौकटींना प्रश्न विचारणारा, सत्याचा शोध घेणारा आणि बाह्य दिखाव्यापेक्षा मूळ कारणापर्यंत जाणारा ग्रह मानला जातो.
निवडणुकांवर प्रभाव…
म्हणून मूलांक २चा चंद्र आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या अंक ७चा केतू यांचा संयोग अन्यायाविरुद्धच्या लढ्याला भावनिक जाणीव आणि निर्भीड, वेगळा दृष्टिकोन देणारा मानता येईल. अन्यायासाठी लढून न्याय मिळवण्यात पुढील काळातही यश मिळण्याची शक्यता दिपके यांच्या बाबतीत सर्वाधिक दिसते आहे. २०२७, २०२८ आणि २०२९ ही तिन्ही वर्ष अभिजीत दिपकेसाठी चांगली आहेत. २०२९ रोजी लोकसभा आणि राज्य विधानसभेच्याही निवडणुका असतील, या दोन्ही निवडणुकांवर त्याचा प्रभाव राहील, असे संख्याशास्त्राच्या गणितानुसार दिसते आहे.
