Diwali Laxmi Pujan: हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी आणते. या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह कुबेर, गणपती आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. यंदा अनेक ठिकाणी २० ऑक्टोबर तर काही ठिकाणी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाईल. दरम्यान, लक्ष्मी पूजनात सर्वात महत्वाची असलेली देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नक्की कसा असावा हे आपण जाणून घेऊ
कधी असावी देवी लक्ष्मीची मूर्ती?
- वास्तू शास्त्रानुसार, दिवाळीला देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करताना लक्षात घ्या की, देवीची मूर्ती आर्शीवाद देणारी आणि पद्मासन स्थितीत बसलेली असावी.
- वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचा फोटोचे पूजन करणे देखील शुभ मानले जाते.
- देवी लक्ष्मीच्या फोटोमध्ये पाण्याचा वर्षावर करणाऱ्या हत्तींचे चित्र असणे देखील शुभ मानले जाते.
- तसेच लक्ष्मी देवी कमाळात बसलेली आणि तिच्या हातातून धनवर्षाव होत असलेला मूर्ती, फोटो असावा.
- जर तुम्ही मूर्तीचे पूजन करणार असाल तर देवीच्या पिवळेच्या किंवा चांदीच्या मूर्तीचे पूजन करणे शुभ मानले जाते.
देवी लक्ष्मीचा अशा प्रकारचा फोटो, मूर्ती कधीही ठेवू नका
घरामध्ये कधीही देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. यामुळे घरामध्ये अस्थिर लक्ष्मीचा वास होतो. यामुळे घरामध्ये आर्थिक परिस्थिती देखील निर्माण होते. असे म्हटले जाते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
