आचार्य चाणक्य यांचे विचार सर्वोत्तम मानले जातात. असे मानले जाते की चाणक्यच्या विचारांचे पालन केल्याने जीवन आनंदी होऊ शकते. तसेच जीवनात शांती आणि यशाचा मार्गही सापडतो. चाणक्याने अनेक धर्मग्रंथांची रचना केली होती, ज्यांचे पालन आजही मानव करत आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये त्यांनी व्यक्तीला ध्येय गाठण्याचा मार्ग सांगितला आहे. तसेच, अशा काही गोष्टी समजावून सांगितल्या आहेत, ज्या दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचार्य चाणक्यांनी एका धोरणात सांगितले आहे की कोणत्या गोष्टींना पायांचा स्पर्श होणं चुकीचं आहे. या गोष्टींवर पाय ठेवल्याने माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होते. जीवनातून सर्व काही हरवून जाते. चला जाणून घेऊया, कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर पाय ठेवू नयेत.

अग्नी- आचार्य चाणक्य म्हणतात की, अग्नीला पाय लावणे अशुभ मानले जाते. अग्निदेवतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. आणि त्यांना साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ परिणाम मिळतात.

वृद्ध- ज्येष्ठांचा आणि वृद्धांचा आदर केला पाहिजे, असे नेहमीच म्हटले जाते. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घ्यावा. पण चुकूनही त्यांना पाय लावू नयेत. असे म्हणतात की त्यांना पाय लागल्याने पाप लागतं. चाणक्य सांगतात की ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर केला जात नाही त्या घरात सुख-समृद्धी कधीच येत नाही. अशा घरात देवी लक्ष्मीही वास करत नाही आणि रागावून निघून जाते.

आणखी वाचा : ३६ तासांनंतर बनतोय बुध-गुरूसोबत ‘संसप्तक योग’, ‘या’ लोकांचे भाग्य चमकू शकते

गुरू- धार्मिक ग्रंथांमध्ये गुरूला आई-वडिलांपेक्षा वरचे स्थान दिले आहे, अशा स्थितीत गुरूंचा अनादर हा ईश्वराचा अनादर मानला जातो. चाणक्यांच्या मते, गुरुंचा नेहमी आदर केला पाहिजे आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. असे म्हटले जाते की कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गुरुंचा आशीर्वाद घेतल्याने व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते.

कन्या – हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. अशा स्थितीत चाणक्यांच्या मते, मुलीना पायाने स्पर्श करणे किंवा तिला पाय लावणे हे देवीला पाय लागण्यासारखे आहे. मुलीला चुकून पाय लागला तर लगेच माफी मागावी. असे न केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

गाय- गायीला हिंदू धर्मातही पूजनीय स्थान आहे. अशा स्थितीत गाईला पाय लागल्याने मनुष्य पापात सहभागी होतो. गाय घराबाहेर पडल्यावर तिला मारून हाकलून देऊ नका, तर तिला भाकर द्या आणि गाईच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya chanakya niti do not touch these things by feet otherwise life will be ruined prp
First published on: 20-08-2022 at 09:00 IST