Habits Attract Goddess Lakshmi’s Blessings : आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी, समाधानी व सुंदर बनवण्यासाठी अनेक लहान सहान बारकावे सांगितल्याचे मानले जाते. हे लहान सहन बारकावे ‘चाणक्य नीती’ मध्ये स्पष्ट केले आहेत. नीतिशास्त्रामध्ये आचार्य चाणक्यांनी अशा विशिष्ट गोष्टींचा उल्लेख केला आहे, जिथे सुख, समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा वास करते. तसेच, अशा घरातील सदस्यांकडे कोणते सद्गुण, गुणविशेष असायला हवेत, याबद्दलही सांगितले आहे. तर आज आम्ही तुम्हाला याच विषयाशी संबंधित माहिती देणार आहोत.

अन्नाचा आदर

आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या घरांमध्ये अन्नाचा आदर केला जातो, तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करते. ज्या घरांमध्ये कुटुंबातील सदस्य अन्नाची नासाडी करतात. शिवाय, स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी तशीच पडून असतात त्यांना मात्र लक्ष्मीकृपा लाभत नाही.

पती-पत्नीमधील प्रेम

चाणक्य नीतीनुसार, ज्या घरामध्ये पती-पत्नी यांच्यात प्रेम व परस्पर आदरभाव असतो, ते घर म्हणजे साक्षात स्वर्गच होय. पती-पत्नीमधील या स्नेहाचा घरातील मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो आणि यामुळे कुटुंबात एकोपाही निर्माण होतो. अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी निश्चितपणे वास करते, तेथील रहिवाशांवर तिचा आशीर्वाद असतो. थोडक्यात सांगायचे तर, आचार्य चाणक्य असा संदेश देतात की, पती आणि पत्नी यांच्यात सदैव प्रेम व आदरभाव असला पाहिजे; यामुळे कौटुंबिक नातं सुद्धा घट्ट होतं.

विद्वान लोकांचा आदर

ज्या घरात ज्ञानाला महत्त्व दिलं जातं आणि ज्ञानी, विद्वान लोकांचा आदर केला जातो, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी टिकून राहते. अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपा कायम असते. त्यामुळे घरात भरभराट होते. त्याचबरोबर, जे लोक ज्ञानी लोकांचा आणि विद्वानांचा सन्मान करतात, त्यांच्यावर माता सरस्वतीचं आशीर्वादही कायम राहतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)