Horoscope Today 15 June 2026 In Marathi : उद्या १५ जून २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील अमावस्या असणार आहे. चतुर्दशी तिथी १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मृगषिरा नक्षत्र जागृत असेल आणि शूल योग जुळून येणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ७ वाजून ८ मिनिटांनी सुरु होईल ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. आज १५ तारखेला अधिक ज्येष्ठ मास संपून निज ज्येष्ठ मास सुरू होत असताना सोमवती अमावस्येचा अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. आज अमावास्येचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार चला जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, १५ जून २०२६ (Today Horoscope 15 June 2026 In Marathi)

आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.

आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.

आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अती घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.

आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.

आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.

आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.

आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.

आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.

आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.

आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

अति घाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर