Daily Horoscope 28 May 2026 In Marathi : उद्या २८ मे २०२६ रोजी अधिक महिन्यातील जेष्ठ महिन्यातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी गुरुवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरु होईल. रात्री ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत वरियान योग जुळून येईल आणि सकाळी ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र आणि त्यानंतर स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून २ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे.

त्याचबरोबर आज अधिक मासातील गुरु प्रदोष व्रत असणार आहे. हे व्रत दर महिन्यातील त्रयोदशी तिथीला केले जाते. प्रदोष व्रत हे ज्योतिष शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. तसेच आज स्वामींचा गुरुवार देखील असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, २८ मे २०२६ (Horoscope Today 28 May 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

कामात तुमचा आवेश कामाला येईल. तांत्रिक कामात प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. परोपकाराचा मार्ग अवलंबाल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

कौटुंबिक कामातून लाभ होईल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कामात क्षुल्लक अडथळे येऊ शकतात.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

तुमची धावपळ वाढू शकते. दिवसभर कामात व्यग्र राहाल. मनातील निराशा दूर सारावी. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. काही नवीन स्वप्ने आकार घेऊ लागतील. पत्नीचा गैरसमज दूर करावा लागेल. लहानांबरोबर मजा मस्ती कराल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. गुरूजनांची भेट होईल. अधिकारी लोकांच्यात वावराल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी केल्या जातील.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. उष्णतेचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात. जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. उत्साहावर पाणी पडू देऊ नका. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक शांतता जपावी लागेल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

काहीसे हट्टीपणे वागाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरावेत. रोकठोक बोलणे टाळावे लागेल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

थोडाफार डोकेदुखीचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. कारण नसताना रागराग करू नये. कोणत्याही प्रसंगी संयम सोडून चालणार नाही.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामे स्वबळावर पूर्ण करावीत. नसत्या शंका उत्पन्न करू नका. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर