Today Horoscope 31 May 2026 In Marathi : उद्या ३१ मे २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा असणार आहे. आज रात्री ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत सिद्ध योग जुळून येईल आणि सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ५ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज पौर्णिमा असणार आहे. तीन वर्षानंतर अधिक पौर्णिमेचा महासंयोग जुळून आला आहे. तर अधीक मासातील पौर्णिमा तुमच्यासाठी कशी जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ३१ मे २०२६ (Aajche Rashi Bhavishya 31 May 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अती काटकसर करून चालणार नाही.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हित शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर