Rashi Bhavishya 3 June 2026 In Marathi : उद्या ३ जून २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील तृतीया तिथी रात्री ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत असेल आणि मग चतुर्थी तिथी सुरु होईल. आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी शुभ योग जुळून येईल आणि रात्री १० वाजून ७ मिनिटांनी पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून ३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अधिक मासातील विभुवनी संकष्टी चतुर्थी असणार आहे. तुम्हाला बाप्पा आज कोणत्या रूपात आशीर्वाद देणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ३ जून २०२६ (Dainik Rashi Bhavishya 3 June 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावेत. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. यांत्रिक उद्योगातून फायदा संभवतो. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
काम आणि वेळ यांचा ताळमेळ घालावा. भांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो. तिखट व तामसी पदार्थ खाल. पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी. चपळाईने कामे तडीस न्याल. मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल. मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका. भावंडांचा विरोध सहन करावा लागेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. पुढचा मागचा विचार न करता वागू नका. तिखट व तामसी पदार्थ खाल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. हित शत्रूंचा त्रास संभवतो. अती अट्टाहास करू नका. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. स्वत:च मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता. सहकुटुंब प्रवास टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
