scorecardresearch

१९२३ नंतर पहिल्यांदा जुळले चार महाराजयोग; ‘या’ 5 राशींचे नशीब पालटणार? बँक बॅलन्समुळे बदलू शकते आयुष्य

Shani Creates Rajyog: गजकेसरी, नीचभंग, बुधादित्य व हंस राजयोग बनल्याने याचा प्रभाव १२ राशींवर विविध रूपात दिसून येऊ शकतो. मात्र चार अशा राशी आहेत ज्यांना या चारही राजयोगांचा भरपूर फायदा होऊ शकतो

After 100 Years Four Rare Rajyog Will Totally Change Life Of Five Zodiac Signs Bank Balance To Raise Money Astrology News
१९२३ नंतर पहिल्यांदा जुळले चार महाराजयोग; 'या' ५ राशींचे नशीब पालटणार? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gajkesri Yog Neechbhang Rajyog Budhaditya Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा शुभ व अशुभ प्रभाव मानवी आयुष्यात सुद्धा दिसून येऊ शकतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आता १०० वर्षांनी तब्बल चार महा राजयोग तयार होत आहेत. गजकेसरी, नीचभंग, बुधादित्य व हंस राजयोग बनल्याने याचा प्रभाव १२ राशींवर विविध रूपात दिसून येऊ शकतो. मात्र चार अशा राशी आहेत ज्यांना या चारही राजयोगांचा भरपूर फायदा होऊ शकतो. येत्या एप्रिल महिन्यात या राशींना प्रचंड धनलाभ व पदोन्नती अनुभवता येऊ शकते. करिअरमध्ये तुम्हाला एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया…

वृषभ रास (Taurus Zodiac)

चारही महा राजयोग आपल्या राशीला प्रचंड लाभदायक ठरू शकतात. हे राजयोग आपल्या राशीच्या लाभ स्थानी तयार होणार आहे. या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे. येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. तसेच तुमच्या व्यक्तिमत्वात काही अत्यंत सुंदर बदल घडू शकतात. तुम्ही सहज म्हणून केलेली एखादी कृती तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देऊ शकते. तसेच तुमच्या मदतीने एखाद्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी लाभू शकते. वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

हे चार राजयोग बनताच कुंभ राशीचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. ग्रहांचे गोचर कुंडलीतील भाग्य स्थानी होऊन हे चार राजयोग तयार होत आहेत.यामुळे येत्या काळात आपल्याला प्रचंड प्रगतीची संधी आहे. तुम्हाला बँकेतील सेव्हिंगची गुंतवणूक सुरु करण्याची संधी ओळखणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रचंड स्तुती ऐकायला मिळू शकते. तुमच्या भाग्यात परदेश प्रवासाचे योग आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो त्यामुळे तुमच्या वाट्याला येणारी एकही संधी सोडू नका.

मिथुन रास (Mithun Zodiac)

गजकेसरी, नीचभंग, बुधादित्य व हंस राजयोग आपल्या राशीच्या कर्म स्थानी तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला नात्यांमध्ये प्रेम व एकोपा अनुभवता येऊ शकतो. बेरोजगार मंडळींना नोकरीची संधी लाभू शकते. तुम्हाला कामाच्या निमित्ताने अन्य शहरात वास्तव्यास जावे लागू शकते. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कामाचे काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. यावेळी इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला इतरांचे सहकार्य करून अधिक धनलाभ मिळवण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात.

कन्या रास (Kanya Zodiac)

चार महायोग बनल्याने कन्या राशीच्या भाग्यात अच्छे दिन सुरु होऊ शकतात. हे ४ राजयोग आपल्या राशीच्या सप्तम भावी सुरु होत आहेत. आपल्या कुंडलीत प्रॉपर्टीच्या खरेदी- विक्रीचा योग आहे. यातूनच आपल्याला येत्या काळात प्रचंड धनलाभ सुद्धा होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रेमाच्या माणसाची महत्त्वाची साथ लाभू शकते यामुळे तुमच्या दोघांच्याही आयुष्यात काही मोठे व महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तुम्हाला कौटुंबिक सुखामुळे मानसिक ताण तणाव दूर ठेवता येईल.

हे ही वाचा<< लक्ष्मीकृपा व धनलाभासाठी घरात ‘या’ ठिकाणी कासवाची मूर्ती ठेवणे ठरते पवित्र? वास्तूतज्ज्ञांच्या टिप्स वाचा

धनु (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी चारही योग लाभदायक ठरू शकतात. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या चौथ्या स्थानी हा योग तयार होणार आहे. जो भौतिक सुख स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला मातृपक्षाकडून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. दुसरीकडे, जानेवारीपासून तुम्हाला शनीच्या साडे सतीपासून मुक्तता मिळाली आहे. त्यामुळे आता तुमची थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या