Raja Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट काळानंतर राशी परिवर्तन करतो; ज्यामुळे अनेकदा शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्यांचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर प्रकर्षाने पाहायला मिळतो. अशातच १ मे रोजी गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला होता. तसेच, केतू ग्रह ३० ऑक्टोबर २०२३ पासून कन्या राशीत आहे; ज्यामुळे आता हे दोन्ही ग्रह नवव्या आणि पाचव्या घरात उपस्थित आहेत. त्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला असून, हा योग सिंह राशीमध्ये निर्माण होत आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल; परंतु काही राशींना त्याचे अनेक फायदे होतील. सोबतच त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धीदेखील येईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुमच्या पगारात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

मिथुन

नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठीही खूप सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. आयुष्यात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. प्रगती कराल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल.

हेही वाचा: वैशाख पौर्णिमेला ‘या’ पाच राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठेत होणार वाढ

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठीही नवपंचम राजयोग अनेक नवे बदल घेऊन येणारा ठरेल. वडिलोपार्जित जमिनीमुळे फायदा होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल.अडचणींवर मात कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)