Surya Grahan 2023: २०२३ मध्ये एकूण ४ ग्रहण होणार आहेत, त्यापैकी पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिलला असणार आहे. ज्योतिष व खगोलशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदाचे सूर्यग्रहण हे हायब्रीड असणार आहे. एकाच दिवशी तब्बल तीन वेळा आकाशात सूर्यग्रहण दिसणार आहे.जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण सुरु होते. खरं तर सूर्य चंद्राच्या मागे लपतो आणि त्यामुळे काही काळासाठी अंधार पसरतो.

२०२३ वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत राहील. सूर्य ग्रहण तीन रूपात दिसणार आहे, म्हणजेच पूर्ण, कुंडलीकार व आंशिक रूपात ग्रहण दिसून येऊ शकते. हा योग तब्बल १०० वर्षांनी जुळून आलेला आहे त्यामुळे याचा प्रभावसुद्धा तितकाच प्रबळ व प्रभावी असणार आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदाचे पहिले सूर्यग्रहण हे तीन राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून त्यांना बक्कळ धनलाभ व तेजस्वी आयुष्य अनुभवायला मिळू शकते.

After 30 years Shani-Surya make samsaptak yoga
३० वर्षांनंतर शनी-सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी आणि भौतिक सुख
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
Loksatta kutuhal Discovery of aliens with the help of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने परग्रहांचा शोध
Surya ketu yuti 2024 | Surya ketu yuti 2024 marathi news
Surya ketu yuti 2024 : १८ वर्षानंतर ग्रहांचा राजा सूर्याची केतुबरोबर होईल युती! ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळेल अपार धनलाभ
Surya Nakshatra Gochar 2024 | sun transit in Purva Phalguni Nakshatra
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशींना होणार अपार धनलाभ, सूर्यासारखं चमकणार नशीब
Guru Vakri 2024
४४ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय, आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? देवगुरुच्या कृपेने मिळू शकतो पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी

सूर्यग्रहणाला ‘या’ राशी होतील अत्यंत धनवान?

मेष रास (Mesh Zodiac)

हे सूर्यग्रहण लागताना स्वतः सूर्यदेव हे मेष राशीत असणार आहे. या राशीच्या लोकांवर सूर्यग्रहण हे सर्वाधिक परिणामकारक ठरू शकते. या लोकांना करिअरमध्ये वेग अनुभवता येऊ शकतो पण तुम्हाला या काळात संयम ठेवावा लागेल. शनी आणि गुरू या ग्रहांची साथ चांगली मिळेल. कामाच्या ठिकाणी आपला प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे अडचणीतून मार्ग निघेल. आर्थिकदृष्टय़ा उत्कर्ष होईल.

सिंह रास (Sinha Zodiac)

सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि सूर्यग्रहण देखील या राशीच्या लोकांना खूप प्रभावित करेल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकणार नाही. काही कामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे. २१ एप्रिलला गुरुचा मेष राशीतील प्रवेश आपल्याला नवी ऊर्जा, नवे चैतन्य देईल. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा सुरू कराल. मेहनतीला चांगले फळ मिळणार आहे हे लक्षात असुद्या.

हे ही वाचा<< शनिदेव आजपासून ‘या’ राशींना देतील प्रचंड धनलाभ? शक्तीशाली बनून बनवू शकतात करोडपती

कन्या रास (Kanya Zodiac)

भाग्य स्थानातील शुक्र उच्च शिक्षणासाठी पूरक ठरेल. अडकलेली कामे पुढे सरकतील. कामकाजावर मंगळाचा प्रभाव पडेल. इतरांच्या मागे लागून कामं पूर्ण करून घ्याल. देणेकऱ्यांकडे तगादा लावाल. डोक्याचा ताप वाढेल. २१ एप्रिलला सप्तमातील गुरू अष्टमात, मेष राशीत प्रवेश करत आहे. तेव्हापासून आपले गुरुबल कमजोर होत आहे. ताण तणाव वाढेल. आर्थिक दृष्ट्या कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. विद्यार्थी वर्गाने डोळसपणे मेहनत घ्यावी. सर्दी, खोकला, ताप असे त्रास उदभवतील.

याशिवाय वृश्चिक, कुंभ व मीन राशीला सुद्धा काही अंशी धनलाभ अनुभवता येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)