scorecardresearch

शेकडो वर्षांनंतर बनतोय ग्रहांचा महासंयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा, भाग्यही उजळणार?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात २२ मार्चपासून होत आहे.

chaitra navratri 2023
तब्बल ११० वर्षांनंतर एक मोठा महासंयोग घडत आहे. (फोटो – लोकसत्ता ग्रफिक्स टीम)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात २२ मार्चपासून होत आहे. हिंदू नववर्ष संवत (संवत्सर) २०८० देखील सुरू होत आहे. तर यावेळी तब्बल ११० वर्षांनंतर एक मोठा महासंयोग घडत आहे. तो म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्र २२ मार्चला सुरू होत असून ते ३० मार्चपर्यंत राहणार आहे. हे संपूर्ण ९ दिवसांचे नवरात्र असेल. याच्या तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये चार ग्रहांचे परिवर्तन पाहायला मिळणार आहे. हा योगायोग ११० वर्षांनंतर घडत आहे. या महासंयोगचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण त्यापैकी ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

वृषभ राशी –

वृषभ राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा महासंयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण शनि तुमच्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग आणि शश राजयोग बनवून बसला आहे. त्यामुळे यावेळी तुमच्याकडे पैशाचा ओघ येण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते. नवीन व्यवहारांतील सौद्ये पुर्ण होऊ शकतात. या काळात तुमचे नशिबही तुम्हाला साथ देईल ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन राशी –

ग्रहांचा महासंयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी, तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करू शकता किंवा यावेळी नवीन करार करू शकता. जे भविष्यात तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात. हा कालावधी स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो, ज्यामुळे ते कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो. याशिवाय विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.

धनु राशी –

हेही वाचा – १६ एप्रिलपर्यंत युतीचे बळ वाढून ‘या’ 5 राशी होतील अपार श्रीमंत? बुध- गुरु देऊ शकतात नशिबाला कलाटणी

ग्रहांचा महासंयोग तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. शिवाय जर तुम्हाला या काळात भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरु शकतो. त्याच वेळी, तुमच्या धैर्य आणि शौर्यामध्ये वाढ होऊ शकते. व्यावसायिक जीवनात शत्रू वर्चस्व गाजवू शकणार नाहीत. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता.

(टीप: वरील दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 17:09 IST