Ruchak Raja Yoga: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, ऊर्जा व आत्मविश्वास यांचा कारक ग्रह मानले जाते. मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होताच त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर होत असल्याचे पाहायला मिळते. पंचांगानुसार १ जून रोजी दुपारी ३ वाजून ३९ मिनिटांनी मंगळ ग्रह मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करील आणि १२ जुलैपर्यंत तो याच राशीत राहील.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मंगळ त्याची स्वराशी असलेल्या मेष किंवा वृश्चिक राशीत प्रवेश करतो किंवा मकर राशीत मध्यभागी असतो तेव्हा रुचक योग तयार होतो. त्यामुळेच जेव्हा मंगळ मेष राशीत प्रवेश करील तेव्हा रुचक योग तयार होईल. हा योग तयार झाल्याने व्यक्तीमध्ये साहस आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तसेच त्याची मानसिक स्थितीदेखील मजबूत होते. या योगाचा काही राशींच्या व्यक्तींना फायदा होईल.

मेष

मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर नेहमीच मंगळाची कृपा असते. मेष राशीतील राशी परिवर्तनात मंगळ मेष राशीच्या लग्न स्थानात असेल; ज्याच्या प्रभावाने या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळ ग्रहाच्या मेष राशीतील प्रवेशामुळे अनेक फायदे होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा: Surya Grahan 2024 : कंकणाकृती असणार दुसरे सूर्यग्रहण; पण हे भारतात दिसणार का? जाणून घ्या तिथी आणि सुतक काळ

धनु

मंगळाचे मेष राशीत परिवर्तन करण्यामुळे धनु राशीच्या लोकांना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळवाल. नशीब तुमच्या बाजूने असेल. सर्व गोष्टी मनासारख्या होतील.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. )