Guru Vakri After 12 Years : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर गोचर करतो. याचा थेट परिणाम राशिचक्रातील बारा राशींवर दिसून येत. पुढील महिन्यात ९ ऑक्टोबर ला गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये उलट चाल चालणार आहे. तसेच पुढील वर्षी ५ फेब्रुवारी याच अवस्थेत संचरण करणार. गुरू हा ज्ञान, समृद्धी, संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. गुरूच्या वक्रीमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. या दरम्यान त्यांना नवी नोकरी, पद-प्रतिष्ठा मिळू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत? (Guru Vakri After 12 Years: Three Zodiac Signs to Receive Wealth & Prosperity)
वृश्चिक राशी
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री चाल लाभदायक ठरू शकते. गुरू सप्तम भावात वक्री होणार आहे. अशात विवाहित लोकांच्या जीवनावर यांचा चांगला परिणाम दिसून येईल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. या वेळी या लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. जीवनात सकारात्मकता वाढणार. गुरू आपल्या राशीमध्ये धन आणि पंचम भावचे स्वामी आहे. अशात या लोकांना अपत्यांपासून शुभ वार्ता मिळू शकते.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरू या लोकांच्या सहाव्या स्थानावर वक्री करणार आहे. त्यामुळे या लोकांना कायदेशीर बाबींपासून दिलासा मिळू शकतो. या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. लोकांबरोबर भेटीगाठी होतील ज्याचा भविष्यात या लोकांना फायदा होऊ शकतो. जीवनात भरपूर यश मिळेल. गुरू ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये लग्न व चतुर्थ भावचे स्वामी आहे. त्यामुळे या लोकांना सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळणार. वाहतूक व प्रॉपर्टीचे सुख प्राप्त होईल.
वृषभ राशी
गुरूची चाल या राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. गुरू ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीच्या लग्न भाववर उलट चाल चालणार आहे. त्यामुळे या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मनासारखे यश मिळू शकते. अचानक अडकलेला पैसा परत मिळू शकतो. विवाहित लोकांना सुख समृद्धी लाभेल. अविवाहित लोकांना लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची या लोकांना भरपूर संधी मिळेल आणि चांगला नफा मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)