Gudhi Padwa 2023 Guru Surya Yuti: हिंदू दिनदर्शिकेनुसार येत्या २२ मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याच्या शेवटाकडे तब्बल १२ वर्षांनी पहिल्यांदाच गुरु व सूर्याच्या युतीसह गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. २२ एप्रिलला बृहस्पती गुरु ब्रम्हमुहूर्तावर मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी १४ एप्रिललाच सूर्यदेव मेष राशीत स्थिर होणार आहेत. २२ एप्रिलला गुरु व सूर्याची युती होऊन ५ राशींच्या गोचर कुंडलीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या राजयोगासह ५ राशींच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. या राशींना येत्या काळात प्रचंड धनलाभ व अपार श्रीमंतीचे योग आहेत. कोणत्या रूपात आपल्या दारी लक्ष्मी येऊ शकते हे सविस्तर जाणून घेऊयात..
वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार जेव्हा राहू मेष राशीत स्थित असतो व गुरु मेष राशीत प्रवेश करतो ही वेळ एकच जुळून आल्यास तेव्हा गजलक्ष्मी राजयोग निर्माण होतो. योगायोगाने यावेळी या युतीत सूर्य सुद्धा स्थिर असल्याने खालील राशींना प्रचंड लाभाची संधी आहे.
मेष (Aries Zodiac)
सूर्य व गुरु मूळ मेष राशीतच प्रथम भावात स्थिर असल्याने मेष राशीसाठी येणारे नववर्ष हे सुवर्णसंधींनी भरलेले असू शकते. या राजयोगासह आपल्या व्यवसायात वृद्धीचे संकेत आहेत. आपल्याला शारीरिक व मानसिक ऊर्जा जाणवेल. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. तसेच आपल्याला कामाच्या ठिकाणी सर्व ध्येय पूर्ण करता येऊ शकतात. याचा प्रभाव आपल्या वेतनावर व पदोन्नतीवर होऊ शकतो.
मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या ११ व्या स्थानी गुरु- सूर्य युती प्रभाव असणार आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला आर्थिक फायद्याची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कल्पना स्वीकारल्या जातील व याचा प्रभाव तुमच्या पगारात सुद्धा दिसून येऊ शकतो. आपल्याला प्रवासाचे योग आहेत. येत्या काळात जोडीदाराकडून तुमच्या काही अपेक्षा अत्यंत सुंदररित्या पूर्ण होऊ शकतात.
मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या चतुर्थ स्थानी गुरु सूर्य युती तयार होत आहे. हे स्थान भौतिक सुख व सुविधांचे केंद्र मानले जाते. येत्या काळात आपल्या वाहन व भवन अशा दोन्ही गोष्टी प्राप्त करण्याची संधी लाभू शकते. तुमच्या आई वडिलांसह नाते घट्ट होऊ शकते.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीच्या गोचर कुंडलीत नवव्या स्थानी गुरु व सूर्याची युती तयार होणार आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला परदेश यात्रेची संधी लाभू शकते. आपल्या वाडवडिलांच्या संपत्तीतून धनलाभ होण्याचे योग आहेत. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांची महत्त्वाची भविष्यवाणी
मीन (Pisces Zodiac)
मीन राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानी सूर्य व गुरुची युती तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला वाणीवर काम करावे लागेल पण यातूनच तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याचे सुद्धा योग आहेत. तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळू शकते पण यावेळी अत्यंत हुशारीने काम करावे लागेल. प्रलंबित कामातून आपल्या प्रगतीची चिन्हे आहेत.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)