ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तसेच हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. देवतांचा गुरु बृहस्पती १३ एप्रिल रोजी आपल्या प्रिय मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या मार्गक्रमणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये गुरूचा संबंध ज्ञान, वाढ, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशी आहे. त्यामुळे गुरूचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल. पण तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल शुभ सिद्ध होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी…

वृषभ: गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीत गुरु अकराव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला लाभ आणि उत्पन्नाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच नवीन बिझनेस डील होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल आणि कामात तुमची प्रशंसा होईल. तसेच मीडिया किंवा फिल्म लाइन, फॅशन डिझायनिंगशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. यावेळी करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते.

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

मिथुन: तुमच्या राशीत गुरु ग्रह दशम भावात प्रवेश करेल, हे स्थान करिअर आणि नोकरीचे स्थान आहे. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे, जे मार्केटिंग, वकील आणि मीडिया या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. अशा लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. तसेच मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि बुध ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

३० महिन्यांनंतर शनि ग्रह करणार गोचर, ‘या’ दोन राशी येणार अडीचकीच्या प्रभावाखाली

कर्क: तुमच्या गोचर कुंडलीत नवव्या स्थानात गुरुचे भ्रमण असेल., या स्थान भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान म्हणून मानलं जातं. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामेही होतील. या काळात तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल असन स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकते.