Guru Vakri 2024: ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे देवगुरू बृहस्पतिदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सध्या गुरू वृषभ राशीत विराजमान असून २०२५ पर्यंत तो या राशीत राहील. परंतु तोपर्यंत गुरू अस्त-उदय आणि वक्री आणि मार्गीदेखील होईल. ऑक्टोबर महिन्यात गुरू वृषभ राशीत वक्री होणार आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, गुरू ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून १ मिनिटांनी वृषभ राशीमध्ये वक्री होईल आणि ४ फेब्रुवारी २०२५ च्या दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी याच अवस्थेत राहील आणि त्यानंतर तो पुन्हा मार्गी होईल.

कर्क

गुरू ग्रह कर्क राशीच्या अकाराव्या भावात वक्री होईल. ज्याचा या राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी परिणाम पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कर्क राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. शिक्षणातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. दूरचे प्रवास घडतील. धार्मिक कार्यात रमाल.

कन्या

गुरू ग्रह कन्या राशीच्या नवव्या भावात वक्री होईल. त्यामुळे हा काळ कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. कोणताही निर्णय विचार करून घ्या. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका.

हेही वाचा: बक्कळ पैसा! ऑक्टोबरमध्ये बुध करणार दोन वेळा राशी परिवर्तन; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

धनु

गुरू ग्रह धनु राशीच्या सहाव्या भावात वक्री होईल. त्यामुळे धनु राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चांगले लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. अडकलेली कामे पूर्ण होतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)