scorecardresearch

Shukra Gochar Raj Yog: ५९ वर्षांनी जुळला ‘हा’ दुर्मिळ राजयोग; ‘या’ ४ राशींना अचानक धनलाभाची संधी

Trigahi Rajyog: त्रिग्रही नीचभंग राजयोग बनताना विशेष म्हणजे ग्रहांची ही स्थिती तब्बल ५९ वर्षांनी जुळून आली आहे.

Shukra Gochar Raj Yog: ५९ वर्षांनी जुळला ‘हा’ दुर्मिळ राजयोग; ‘या’ ४ राशींना अचानक धनलाभाची संधी
After 59 years Shukra Gochar Neech Bhang Trigahi Raj Yog

Neech Bhang Raj Yog: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह कोणत्याही राशीत परिवर्तन करतो किंवा अन्य ग्रहांसह युती बनावतो त्यावेळी मानवी जीवनावर म्हणजेच सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात फरक पडतो. काहींसाठी ग्रहांचे परिवर्तन शुभ मानले जाते तर काहींसाठी यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यावेळी २४ सप्टेंबरला शुक्र ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या रास ही दुर्बळ रास मानली जाते मात्र यावेळेस शुक्रासह गुरु व शनीसुद्धा स्वराशीत विराजमान असल्याने त्रिग्रही नीचभंग राजयोग बनत आहे. विशेष म्हणजे ग्रहांची ही स्थिती तब्बल ५९ वर्षांनी जुळून आली आहे.

ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार बुध ग्रहसुद्धा उच्च स्थानी असून सूर्यासह युती बनवत आहे, यामुळे सर्वच राशी प्रभावित होणार असून अशा ४ राशी आहेत ज्यांना विशेष धनलाभ व प्रगतीचे योग आहेत. या राशी कोणत्या व त्यांना कसा फायदा होऊ शकतो पाहुयात..

वृषभ

त्रिग्रही नीचभंग राजयोग वृषभ राशीसाठी लाभदायी ठरण्याची चिन्हे आहेत. वृषभ राशीचा स्वामी शुक्र नीचभंग राजयोगातील प्रमुख ग्रह असणार आहे. तसेच या राशीत गुरु गोचरही झाले आहे. शनिदेव भाग्यकारी स्थानावर आहे व परिणामी धनलाभाची मोठी संधी आहे. केंद्रीय त्रिकोण राजयोग व समसप्तक योगामुळे अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात विशेष फायद्याची चिन्हे आहेत. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी उत्तम योग आहे.

मिथुन

त्रिग्रही नीचभंग राजयोग आपल्यासाठी शुभवार्ता घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास अधिक लाभ होऊ शकतो तर नोकरदारांना सुद्धा टार्गेट पूर्ण करण्यात गती मिळेल. गुंतवणुकीसाठी आताच काळ सर्वात शुभ असू शकतो. तुमची बरेच दिवस अडकलेली कामे मार्गी लागतील असे संकेत आहेत.

सिंह

त्रिग्रही नीचभंग राजयोग आपल्यासाठी करिअर व व्यापारात वृद्धी होण्याचे संकेत आहेत. सिंह राशीचा स्वामी सूर्य बुधादित्य राजयोगात केंद्रस्थानी आहे. सिंह राशीत शुक्र गोचर करून नीचभंग राजयोग तयार झालेला आहे. तुम्हाला नव्या व्यवसायात पदार्पण करायचे असल्यास आता शुभ काळ ठरू शकतो तसेच नोकरी बदलण्यासाठीही हा काळ फायदेशीर असू शकतो. नोकरीत प्रगती होण्याची व पगारवाढीची चिन्हे आहेत.

Best Couple Matches Zodiac: तुमच्या राशीला कोणत्या राशीचा जोडीदार आहे परफेक्ट?

वृश्चिक

त्रिग्रही नीचभंग राजयोग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धनलाभासह मानसिक आनंदही घेऊन येऊ शकतो. तुमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवे ग्राहक तुम्हाला जोडले जातील व बराच काळ अडकलेला पैसा पुन्हा मिळण्याची ही संधी आहे. अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

(टीप- वरील लेख हा माहितीपर असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या