Bhadra Mahapurush Yoga: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन पाहायला मिळते; ज्याचा परिणाम १२ राशींच्या व्यक्तींवर होतो. बऱ्याचदा या राशी परिवर्तनांमुळे शुभ योग आणि राज योगदेखील निर्माण होतात. सप्टेंबरमध्ये बुध ग्रह आपली स्वराशी असलेल्या कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे ‘भद्र महापुरुष योग’ निर्माण होईल. त्यामुळे या राजयोगाचा प्रभाव काही राशींवर होईल. या काळात त्या व्यक्तींना करिअरमध्ये यश पाहायला मिळेल.

या तीन राशीधारकांना मिळणार भरपूर यश (Bhadra Mahapurush Yoga)

मिथुन

बुध ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशाने मिथुन राशीच्या व्यक्तींना अनुकूल परिणाम पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल, कौटुंबिक आयुष्य सुखमय जाईल. मेहनतीचे फळ मिळेल.

कन्या

बुध ग्रह कन्या राशीतच प्रवेश करणार असल्याने हा राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे. वैवाहिक आयुष्य सुखमय जाईल. आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. या काळात तुमच्यात साहस, उत्साह निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

हेही वाचा: २ ऑगस्टपासून सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी अन् आर्थिक लाभ

मकर

भद्र महापुरुष राजयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी भाग्योदय कारक ठरेल. या काळात मानसिक तणाव दूर राहील. घरात शुभ कार्यांचे आयोजन कराल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे चांगले फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येण्याची शक्तता आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)