scorecardresearch

Premium

वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर ‘या’ राशी होणार कोट्याधीश? राहू-केतू-शनिदेवाच्या गोचराने मिळू शकतो प्रचंड पैसा

राहू-केतू शनिदेव यांच्या गोचराने काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…?

Rahu Ketu Shani Gochar
राहू केतू शनिदेव गोचर (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) हे एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी चंद्रग्रहण होतो. वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण पंचांगानुसार, ऑक्टोबर महिन्यातील २९ तारखेला रविवारी असणार आहे. चंद्रग्रहण रात्री ०१:०६ वाजता सुरू होईल आणि ०२:२२ वाजेपर्यंत असणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा कालावधी हा १ तास १६ मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरला राहू-केतू आपली राशी बदलणार आहेत. राहू-केतू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे शनिदेव चार दिवसांनीच आपल्या स्वराशीत जाणार आहेत. त्यामुळे चंद्रग्रहणानंतर राहू-केतू-शनिदेव यांची स्थिती काही राशींना पद-पैसा-प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना मिळेल भरपूर पैसा?

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू-केतू-शनिदेव यांची स्थिती फायदेशीर ठरु शकते. या काळात जीवनात सुख-समृद्धी येऊन आणि तुमच्या जीवनातील सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही विदेशवारीला जाण्याचा विचारही करू शकता. मार्केटिंग, सोशल मीडिया आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित सगळ्याच लोकांना या काळात सकारात्मक फळ मिळू शकते.

Shani Nakshatra Parivartan
सूर्यग्रहणानंतर शनिदेव नक्षत्र परिवर्तन करताच ‘या’ राशींना भरभरून मिळणार पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने येऊ शकतात ‘अच्छे दिन’
Shardiya Navratri 2023
३० वर्षानंतर नवरात्रीला शुभ राजयोग घडल्याने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप संपत्ती
Tirgrahi Yog 2023 in Kanya
येत्या दोन दिवसात त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? सूर्य-बुध-मंगळदेवाच्या कृपने वाढू शकतो बँक बॅलन्स
transit, october grah gochar 2023,
ऑक्टोबरमध्ये शुक्र-सूर्य, राहू-केतूसह ६ ग्रहांच्या चालीत बदल होताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

(हे ही वाचा: शनिदेव दोन वर्ष मकरसह ‘या’ राशींच्या लोकांना देणार बक्कळ पैसा? साडेसातीपासून मुक्ती मिळून होऊ शकता लखपती)

कर्क राशी

राहू-केतू-शनिदेव यांची स्थिती कर्क राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देऊ शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. कामात यश मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी राहू-केतू-शनिदेव यांची स्थिती शुभ ठरु शकते. या राशीच्या मंडळींना या काळात व्यापार रोजगारात आंनदाची बातमी मिळू शकते. या राशींच्या लोकांसाठी पगारवाढीचे योगही बनू शकतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही वेळ योग्य आहे आणि तुम्हाला योग्य निकाल मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After chandra grahan 2023 rahu ketu shani transit these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 25-09-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×