Budh Dev Transit In Makar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. तसेच, हे संक्रमण काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक असतं. ७ फेब्रुवारी रोजी बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे संक्रमण फायदेशीर आणि आनंददायक सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

कर्क राशी

बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून सातव्या घरात होणार आहे. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची साथ मिळेल. तसंच यावेळी व्यवसायातील कोणताही नवीन करार अंतिम होऊ शकतो. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. याकाळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात भ्रमण करणार आहे. याकाळात तुमचा मन सन्मान वाढेल. याशिवाय नोकरदार लोकांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. तसेच यावेळी तुमच्या प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात होऊ शकते. त्याच वेळी, तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

( हे ही वाचा: १५ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा; होऊ शकतात अपार श्रीमंत)

तूळ राशी

बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व सुखे मिळू शकतात. तसेच, तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची योजना बनवू शकता. दुसरीकडे नोकरदार लोकांचा बॉसशी समन्वय चांगला राहील. दुसरीकडे, जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर यावेळी व्यवसायातील नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो. दुसरीकडे, तुमच्या आईशी तुमचे नाते चांगले राहील.