Laxminarayan Yoga: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेक ग्रहांचा एकाच राशीत संयोग होतो आणि त्यामुळे शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. या शुभ योगांमुळे काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार २९ जून रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र ७ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करील. बुध आणि शुक्र ग्रहाच्या कर्क राशीतील प्रवेशाने ‘लक्ष्मीनारायण योग’ निर्माण होईल. हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो आणि त्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात या राशींच्या व्यक्तींना ज्ञान आणि भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

कर्क

कर्क राशीतच हा योग निर्माण झाला असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना लक्ष्मीनारायण योगाचे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

तूळ

बुध आणि शुक्र ग्रहाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होतील. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्याच्या तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

हेही वाचा: जुलै महिन्यात सूर्य, शुक्र, बुध अन् मंगळ देणार बक्कळ पैसा! निर्माण होणार शुभ योग, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठीही लक्ष्मीनारायण योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After one year laxminarayan yoga will be created in cancer the grace of goddess lakshmi will be on the persons of these three zodiac signs sap
Show comments