साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुल्क पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवसी हा सण येतो. या वर्षी ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. तृतीया तिथी मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होईल आणि ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहील. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते, त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे.

यंदा अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्र, शोभन योग, तैतिल करण आणि वृषभ राशीतील चंद्रासोबत येत आहे. मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे या दिवशी मंगळ रोहिणी योग तयार होत आहे. शोभन योगामुळे या दिवसाचे महत्त्व वाढलं आहे. यासह पाच दशकांनंतर ग्रहांचे विशेष योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेला संपत्ती आणि समृद्धी कारक ग्रह शुक्र आणि कार्यसिद्धी देणारा चंद्र ग्रह आपल्या उच्च राशीत असणार आहेत. हा एक अत्यंत शुभ दुर्मिळ योग आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने, दागिने, वाहन किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्याने तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढेल. चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय्य तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्ये तुम्हाला अनेक पटींनी शुभ परिणाम देतील.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

Shani Amavasya 2022: शनैश्चरी अमावस्येला करा ‘हे’ ज्योतिषीय उपाय, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

अक्षय्य तृतीयेला करा हा खास उपाय
१. श्रीसूक्ताचा अकरा वेळा पठण करा.
२. ओम श्रीं श्रीये नम: या मंत्राचा ५ ते ११ माळा जप करा
३. लक्ष्मीजींसोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूला पिवळी फुले, पिवळी मिठाई आणि पिवळी फळे अर्पण करा.
४. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मंदिरात केळीचे झाड लावल्याने व्यक्तीचे वैवाहिक सुख वाढते.
५. तुमच्या घराच्यामुख्य प्रवेशद्वारावर हळदयुक्त पाण्याचा शिडकावा करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा जाईल.
६. या दिवशी पाणी दान केल्याने मानसिक वेदना दूर होतात. मातीच्या भांड्यात पाणी भरून दान केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात.
७. या दिवशी आंब्याचे दान केल्याने आयुर्मान वाढते.
८. या दिवशी विष्णु सहस्रनामाचे पठण अवश्य करावे. घरात सुख-समृद्धी नांदेल.